धाराशिव (प्रतिनिधी)-ब्राह्मण समाजाने स्पर्धेत उतरण्यासाठी विविध व्यावसायिक कौशल्य अंगीकारून आत्मनिर्भर भारतासाठी सज्ज व्हावे असे आवाहन सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केले. ते कळंब ब्राह्मण सेवा संघ व ब्रम्हवार्ता वधुवर सुचक मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वधुवर पालक मेळाव्यात बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बंडोपंत दशरथ उपस्थित होते.

तर डी.के.कुलकर्णी, यशवंतराव दशरथ, श्रीराम विद्वत, अनिल कुलकर्णी कळंब तालुका अध्यक्ष ब्राह्मण सेवा संघ यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना देवीदास पाठक पुढे म्हणाले की, ब्राह्मण समाजातील कुटुंब व्यवस्था वाचवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त नागरिक महिला पुरुषांनी वेळ देण्याची गरज असून ब्राह्मण तरुण-तरुणी यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक कौशल्य अंगीकारून विविध क्षेत्रात कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन आपले करिअर घडवावे.

या मेळाव्याचे आयोजक श्रीराम विद्वत यांनी या मेळाव्यामधून वधूवरांच्या पालकांनी जास्तीत जास्त आपले मित्र नातेवाईक यांना प्रत्यक्ष संपर्क करून विवाहाच्या योगायोगासाठी प्रयत्न करावेत. ब्राह्मण समाजातील पालकांनी आपल्या मुला मुलींवर योग्य संस्कार केल्यास विवाहाची समस्या राहणार नाही.त्यामुळे विवाह जमवण्यासाठी ब्राह्मण समाजाने आपापसात संपर्क वाढवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.के.कुलकर्णी यांनी केले. तर  सुत्रसंचलन सौ.अर्चना बावीकर यांनी केले. आभार सौ.रमाबाई रत्नपारखी यांनी मानले. मेळाव्यासाठी श्रीकांत कळंबकर, गिरीश कुलकर्णी, अमित पाटील, भैय्या बावीकर, दर्शन पोरे, नरेश कुलकर्णी,सतिष कुलकर्णी, यांनी परिश्रम घेतले.या मेळाव्यासाठी 150 वधुवर पालक उपस्थित होते यानिमित्ताने शासनमान्य ब्रह्म वार्ता वधू वर सूचक मंडळाच्या वधू वर सूचक यादी विशेषांकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच या विशेषांकासाठी आणि आगामी काळात वधूवरांच्या शोधासाठी पाक्षिक ब्रम्हवार्ता या शासनमान्य संस्थेकडे नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


 
Top