धाराशिव (प्रतिनिधी)-3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती अर्थात “बालिका दिन“ तसेच महाराष्ट्रात हा दिवस “महिला शिक्षण दिन“ म्हणूनही साजरा केला जातो .

यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील,पर्यवेक्षिका बी.बी. गुंड,  ए.एस. देशमुख, श्रीमती देशमुख एस व्ही., सौ पवार एम.एस., इंगळे पी.डी., कुदळे एस.बी., व्ही.एल.तुळजापूरे, संगिता शिंदे,  एम.पी ठाकूर, एम. पी. पवार, सौ.पी.पी. नलावडे, यांच्यासह इतर महिला शिक्षिकांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे  मुख्याध्यापक  साहेबराव देशमुख, पर्यवेक्षक वाय.के. इंगळे, के.वाय. गायकवाड,सुनील कोरडे, धनंजय देशमुख,निखिलकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थांनी सावित्रीमाईंचे जीवनचरित्र आपल्या भाषणातून सांगितले तसेच निबंध स्पर्धेसह विविध प्रकारच्या वेषभूषा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.


 
Top