धाराशिव (प्रतिनिधी)- शहारातील 2024 च्या मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव धाराशिवचे अध्यक्ष  भाई उद्धवराव पाटील शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख यांची निवड झाली आहे. धाराशिव शहरात होत असलेल्या मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव आयोजित शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. या शिवजयंतीची चर्चा महाराष्ट्र भर होत असते. संयोजन समिती अनेक उपक्रम घेऊन आगळ्यावेगळ्या पध्दतीने जिल्ह्यातील सर्वांना सोबत घेऊन शिवजयंती महोत्सव साजरा करत असते. या वर्षी या मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव चे अध्यक्ष म्हणून पतसंस्थेचे आधारस्तंभ व धाराशिव शहरातील एक धडाकेबाज व्यक्तीमत्व अमरसिंह देशमुख यांची सार्थ अभिमान वाटावा अशी निवड करण्यात आली आहे. ते या कार्यात कोठेही कमी पडणार नाहीत याची खात्री आम्हास आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव कडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे यांचा जन्मदिन असल्याने सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यामंदिर धाराशिव चे सह शिक्षक आदटराव यांनाही त्यांच्या जन्मदिनी  शुभेच्छा देण्यात आल्या. 

या छोटेखानी सत्कार कार्यक्रमावेळी मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने, उपाध्यक्ष रमण जाधव, सत्कार मुर्तींनी आपापले मनोगत व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमास जिल्हा कार्याध्यक्ष भोसले, जिल्हा सहसचिव गीते, मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिंदे, धाराशिव तालुकाध्यक्ष  दराडे, धाराशिव शहराध्यक्ष व्यंकट पाटील, वाशी तालुकाध्यक्ष  अरुण बोंदर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य  सी. एन. माळी, तुळजापूर तालुका कोषाध्यक्ष  गोरे, जिल्हा संघटक  गादेकर, मोरे, मार्गदर्शक रामेश्वर चव्हाण, जिल्हा कलाध्यापक संघ जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे, जिल्हासचिव शेषनाथ वाघ, कलाध्यापक गणेश पांचाळ, साठे, घाटेराव, पतसंस्थेचे कर्मचारी मोरे, करण पेठे आदीसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top