धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिंधी रेल्वे ता. सेलू जि. वर्धा येथून 25 ऑगस्ट 2023 रोजी वि दर्भातील छोट्याशा गावातून शिवरायांच्या किल्ले पाहण्याचे मनात इच्छेची कास धरून सुरुवात करुन विदर्भ ते सिंधुदुर्ग, शिवनेरी, रायगड, प्रतापगड, विशाळगड, पन्हाळगड वाटेत दुर्मिळ दुर्ग सोलापूर भुईकोट किल्ला त्याचबरोबर मराठवाड्यातील नळदुर्ग, परंडा, औसा, उदगीर परतीचा प्रवास वर्ध्याकडे मार्गगमन समयी सुरज संतोष बांगडेचे स्वागत धाराशिव नगरीतील शिवरायावर मनोभावी श्रद्धा असलेल्यांना शिवभक्त सायकल दुर्ग पर्यटकाचे स्वागत पुष्पहार शाल टोपी शिवश्री मुर्ती देऊन करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. श्यामराव दहिटणकर, कलाध्यापक शेषनाथ वाघ, विष्णू इंगळे, डॉ. शतानंद दहिटणकर, सुनिल मिसाळ, हनुमंत दावण, विनायक जाधव, रामानंद माढेकर,आनंद निमकर उपस्थित होते. सुरज हा यांत्रिकी पदविकाधारक असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या किल्ले वैभावाची प्रत्यक्ष अनुभूती घेत असता 4000 कि.मी.चा प्रवास हा प्रेरणादायी ठरला. ठिकठिकाणी शिवरायाच्या संस्काराचा शिवभक्ताच्या सेवेतून चांगला अनुभव आला. कोठेही अडचण आली नाही. त्याच शिवरायांच्या किल्ले दुर्ग महिमा जीवनातून अनुभव ता आला ते माझे भाग्यच. आपण पुढील पिढीनीं जाणावे तसेच असेच पुढे सायकलवरच औयोध्येस श्रीराम मंदीरास जाणार आहे असे मनोगत व्यक्त केले.


 
Top