धाराशिव (प्रतिनिधी)- दुध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दुध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दुध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. याशिवाय, दुधाच्या अति पुष्ट (Super Flush) काळातही दुधाचे दर कोसळतात. ही वस्तुस्थिती आहे. तथापि, असे असुनही राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन “विशेष परिस्थितीत” बाजारात उचित हस्तक्षेप करत असून, दुध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. 

राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दुध दरानुसार भाव मिळत नसल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्याकरिता शासनाने राज्यात स्विकृत होणाऱ्या वेगवेगळया दुधाच्या गुणप्रतीत एकसुत्रता यावी यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर दुधाची गुणप्रत निश्चित केली आहे. 

तथापि, राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यांत आलेली असुन,राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर रु. 5/- अनुदान देणेबाबत शासनाने कृषि,प.दु.म.विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : एमएलके-2023/प्र.क्र.115/पदुम-8 ( ई.क्र.716757 ) दिनांक. 05.01.2024 रोजीच्या संदर्भिय शासन निर्णयानुसार जाहिर केलेले आहे. 

त्यानुसार जिल्हयातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर रु. 5/- अनुदान देणेबाबतची योजना यशस्वीपणे राबविण्याच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये नमुद समितीनुसार  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, धाराशिव यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, धाराशिव येथे दिनांक. 15.01.2023 रोजी जिल्हयातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांच्या तसेच शेतकऱ्यांची बैठक आयोजित करुन, सदरील बैठकीत शासन निर्णयाचे वाचन करुन, अनुदान योजना राबवितांना शासन निर्णयातील अटी व शर्ती विहीत केल्यानुसार अंमलबजावणी करणेबाबत सुचित करण्यांत आले आहे. 

तसेच सदर योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हयातील सहकारी दुध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी मा. आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांचेकडे अर्ज करणे बंधनकारक आहे. सदरचे अर्ज करतांना शासन निर्णयातील अटी व शर्तीप्रमाणे  कागदपत्रांची पुर्तता करुन, शासन निर्णयातील  अटी व शर्तीच्या निकषाच्या अधिन राहुन अनुदान योजनेत सहभाग नोंदविण्यास ईच्छुक असणाऱ्या संघाने / प्रकल्पाने  सदर अर्ज मा. आयुक्त, यांच्या ddcmaharashtra@gmail.com  या ई-मेलवर सादर करुन, त्याची प्रत जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, धाराशिव या कार्यालयाच्या ddcmaharashtra@gmail.com  ई-मेलवर सादर करणेकरिता स्थानिक वर्तमान पत्रात याबाबत व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्याबाबत  पुढील योग्य ती कार्यवाही करण्यांत यावी. असे ही मा. अध्यक्ष यांनी सुचना केलेले आहेत. 

त्याअनुषंगाने सबब धाराशिव जिल्हयातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर रु. 5/- अनुदान देणेबाबतची योजना शासन निर्णयानुसार जाहिर केलेली असुन, सदर योजनेत सहभागी होण्यासाठी शासन निर्णयातील अटी व शर्तीप्रमाणे  कागदपत्रांची पुर्तता करुन, शासन निर्णयातील  अटी व शर्तीच्या निकषाच्या अधिन राहुन अनुदान योजनेत सहभाग नोंदविण्यास ईच्छुक असणाऱ्या संघाने / प्रकल्पाने  सदर अर्ज मा. आयुक्त, यांच्या ddcmaharashtra@gmail.com  या ई-मेलवर सादर करुन, त्याची प्रत जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, धाराशिव या कार्यालयाच्या . ई-मेलवर सादर करणेबाबत आवाहन करण्यांत येत आहे.


 
Top