धाराशिव(प्रतिनिधी)- लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने शनिवार दिनांक 30 मार्च 2024 रोजी छाया दीप मंगल कार्यालय, जिल्हा दूध संघ समोर, धाराशिव येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी दिली.

“विवाह“ हा एक जीवनातील महत्त्वाचा टप्पा तो पार करत असताना समाजातील सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विवाहवेळी येणाऱ्या अडचणी नाहक होणाऱ्या पैशांची उधळण, जाचक हुंडापद्धती, मनुष्यबळाची अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून रोहन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेकवर्षांपासून लोकमंगल फाऊंडेशन च्या माध्यमातून धराशिव जिल्ह्यात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे  आयोजन करण्यात येत आह. आजपर्यंत सोलापूर व धारशिव मध्ये गेल्या 18 वर्षापासून जवळपास 3074 विवाह झाले आहेत.आजपर्यंत या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये हिंदू 2367, बौद्ध 676,  मुस्लीम 20, ख्रिस्ती 4,  जैन 7 या प्रमाणे सर्वधर्मीय  विवाह पार पडले आहेत.

यंदाही लोकमंगल फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हे विवाह सोहळ्याचे 19 वे वर्ष आहे . 30 मार्च रोजी छाया दीप मंगल कार्यालय, जिल्हा दूध संघासमोर, धाराशिव येथे हा विवाहसोहळा दुपारी 12 वाजून 31मिनिटांनी होणार आहे.  विवाह सोहळा दरम्यान सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. विवाहासाठी अंतिम नोंदणी 20 मार्च पर्यंत आहे. नाव नोंदणी धाराशिव येथील लोकमंगल मल्टीस्टेट शाखा तीर्थंकर कॉम्प्लेक्स,आनंद नगर येथे करावी, व तुळजापूर येथील रोहन देशमुख यांचे संपर्क कार्यालय, जुन्या बस स्टँड समोर,आय सी आय सी आय बँकेच्या खाली,लोकमंगल मल्टीस्टेट येथे करावी.अधिक माहितीसाठी विनोद देवकर (9923800256) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. जास्तीत जास्त विवाह इच्छुक वधू-वरांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन रोहन देशमुख यांनी केले आहे.


 
Top