धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील बहुचर्चित खुन प्रकरणात 2 आरोपीना कलम 302 अंतर्गत जिल्हा न्यायाधीश विश्वास मोहीते पाटील यांनी दोषी ठरविले असुन रामचंद्र येडगे व हरीश माशाळे यांना जन्मठेपेची व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर 2020 मध्ये खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिल्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांनी यात सरकारची बाजु मांडली.

21 ऑक्टोबर 2020 रोजी धनाजी गवळी यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, ते व त्यांचे मित्र लक्ष्मण येडगे हे मोटार सायकलवरून शेतात गवत काढायला गेले. त्यानंतर रामचंद्र येडगे व त्यांचा मेहुणा हरीश माशाळे हे तिथे आले व लक्ष्मण यांना दगडाने मारहाण केली व खुन केला. या प्रकरणात 8 साक्षीदार तपासण्यात आले. आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपीना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी राजेश म्हेत्रे, हेड कॉन्स्टेबल सुधाकर सगर यांनी काम पाहिले.


 
Top