धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रोजगाराचा वाढता आलेख आणि रोजगारासाठी प्रथम प्राधान्य देणारे अशी ओळख असणाऱ्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. 23 जानेवारी 2024 रोजी धूत ट्रांसमिशिन या कंपनी ने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊन कॅम्पस ड्राईव्ह घेतला. सदरील कंपनी ही एक भारतीय समूह कंपनी आहे. ज्याचे मुख्यालय औरंगाबाद, महाराष्ट्र, येथे आहे आणि राहुल धूत यांनी 1999 मध्ये याची स्थापना केली. वायरिंग हार्नेस, इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि कंट्रोलर, ऑटोमोटिव्ह स्विच, पॉवर कॉर्ड्स, ऑटोमोटिव्ह केबल्स, कनेक्टर आणि टर्मिनल्स, टू-व्हीलर, थ्री-व्हीलर, कमर्शियल वाहने, ऑफ-रोड वाहने, अर्थ मूव्हर्स, शेती उपकरणे, वैद्यकीय उपकरणे आणि घरगुती उपकरणे इत्यादी विविध उत्पादनांमध्ये हा व्यवसाय चालवते. कंपनीचे हेड दीपक उबाळे यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या असून त्या मधून 15 विद्यार्थ्यांची इंटर्न्स बेस म्हणून निवड केली. या विद्यार्थ्यांना कंपनी मार्फत पहिले 6 महिने स्टायपेंड सहित प्रशिक्षण देणार असून त्यांना इंडस्ट्री नॉर्मच्या योग्यतेनुसार बनवणार आहे.या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले कि “इंटर्न्स बेस निवडीमुळे मुलांना खूप फायदा होतो. शिकण्यास भरपूर मिळते. आणि स्टुडंट्स इंडस्ट्री प्रमाणानुसार तयार होतात. महाविद्यालय नेहमीच इंटर्न्स बेस निवडीला प्राध्यान्य देते. “ तेरणा ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय डॉ. पदमसिंह पाटील, ट्रस्टी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, मल्हार पाटील आणि तेरणा ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्व्यक प्रा. गणेश भातलवंडे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदरील कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन टीपीओ प्रा. अशोक जगताप, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, रामेश्वर मुंढे यांनी केले होते.