कळंब (प्रतिनिधी)- गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने घेण्यात येणारी गांधी विचार संस्कार परीक्षा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग तर्फे दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गांधींचे विचार तरुणांना समजावे, गांधींचे विचार तरुणांमध्ये रुजावे यासाठी घेतल्या जाणारी गांधीविचार संस्कार परीक्षा  महाविद्यालय मध्ये घेण्यात आली.

यावेळी परीक्षेचे पर्यवेक्षक म्हणून प्रा .सुशील जमाले, प्रा. शाहरुख शेख, डॉ. नामानंद साठे यांनी सहकार्य केले. या परीक्षेचे समन्वयक म्हणून इतिहास विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.पावडे के.डब्ल्यू. व डॉ.वर्षा सरोदे यांनी काम पाहिले. ही परीक्षा पार पाडण्यासाठी डॉ. मीनाक्षी जाधव, प्रा.अर्चना मुखेडकर, डॉ.नागनाथ आदाटे, प्रा. मेहराज तांबोळी, प्रा. ज्योती टिपरसे, प्रा.किरण बारकुल, संतोष मोरे, अरविंद शिंदे, संदीप सूर्यवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले.


 
Top