तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा धाराशिववतीने नववर्षचा प्रथम दिनी सोमवार दि. 1 जानेवारी रोजी कांदा प्रश्नावर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांचा विचार न केल्यास भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दिली.
या निवेदनाचा विचार न झाल्यास माजी खा. राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार भव्य मोर्चा काढण्याचा आयोजन करण्यात येणार आहे. याची तारीख जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निश्चय करायचा ठरवलेलं आहे. जर कांदाच्या प्रश्नावर सरकार दाद नसेल तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील काळामध्ये करावा लागेल. याकरता सर्व शेतकरी बांधवांनी, कांदा उत्पादक, ऊस उत्पादक, दूध उत्पादक, सर्व शेतकऱ्यांनी आपल्या न्यायासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रवींद्र इंगळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष धाराशिव यांनी केले आहे.