धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाज आरक्षणासाठी 20 जानेवारी रोजी  मुंबई पायी दिंडीत सहभागी होवून ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळेपर्यंत साथ देण्याचा निर्धार धाराशिव सकल मराठा समाजाच्या धाराशिव येथील. दि. 30  डिसेंबर रोजी झालेल्या समाजाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच 1 जानेवारीला सकल मराठा समाज जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या वेळी गावोगावी जाऊन वातावरण निर्मिती साठी कोअर टीमची निर्मिती करण्यात करण्यात आली. सोमवार (दि. 1 जानेवारी) रोजी मराठा समाज जिल्हा संपर्क कार्यालात फूड विल्ला छत्रपती संभाजी महाराज चौपाटी जवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 20 जानेवारी रोजी निघणाऱ्या मुंबई आरक्षणाच्या, पायी दिंडी मध्ये सहभागी होणाऱ्याची संख्या निश्चित करण्यासाठी फार्म भरून घेतला जाईल. त्यांचे वाहन संख्या, इतर साहित्य याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येऊन. पुढील आठवड्यात मोठया प्रमाणावर जिल्हास्तरीय बैठकीचे नियोजन करण्यात आले. तुळजाभवानीच्या आशीर्वादासह ज्योत घेवून धाराशिवकर मोठया संख्येने आरक्षणाच्या पायी दिंडीत सहभागी  होणार असल्याचे यावेळी ठरले. या बैठकीला जिल्हाभरातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top