तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हयात तुळजापूर तालुक्यात कोरोना बाधीत आढळलेल्या चौदा वर्षाचा रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह आल्याने तुळजापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सदरील रुग्णची आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह आली असली तरी त्यास धाराशिव जिल्हा रुग्णालयात डाँक्टरांचा निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील एका 14 वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याला कोरोनाची लागन झाल्याचे तपासणीतून समोर आले होते. 

त्याची आरटीपीसीआर टेस्ट घेवुन त्याची तपासणी साठी पाठवण्यात आली होती. या कालावधीत त्यास उपजिल्हा रुग्णालय येथे अलगीकरण कक्षात  ठेवले होते. अधीक्षक डॉ चोरमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालय डॉक्टर टीम लक्ष ठेऊन होती. अखेर त्याची टेस्ट निगेटीव्ह आल्याने शहरवासियांसह भाविकांना दिलासा मिळाला असून, जिल्ह्यात जेएन 1 व्हेरीयटचा शिरकाव अजुन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


 
Top