धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हृयाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरगा, परंडा तालुक्यात धाडी मारून अवैध धंद्याविरूध्द कारवाई केली.
पोलीस ठाणे उमरगा हद्दीतील गुंजोटी येथे कुरेशी गल्लीत अवैध कत्तल खान्यावर जनावरांची अवैध कत्तल होत आहे. अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून छापा मारला. सदर ठिकाणी काही इसम मिळून आले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव असलम मोहम्मद कुरेशी, वय 34 वर्षे, इम्रान जहीर कुरेशी वय 25 वर्षे, इरफान मजहर कुरेशी, वय 22 वर्षे तिघेही रा. दर्गा रोड कुरेशी गल्ली गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव असे सागिंतले. त्याठिकाणी मिळून आलेल्या जनावराबाबत त्यांचेकडे चौकशी केली. त्यांनी सदर जनावरे ही कत्तलीकरीता आणल्याचे सागिंतले. सदर ठिकाणी अवैध कत्तल करण्याकरीता बांधलेले 06 बैल, 02 म्हैस, 08 रेडे, 02 रेडकु, 03 गोवंशीय वासरे व कत्तल केलेल्या जनावरांची 4 शिंगे अशी एकुण 5 लाख 26 हजार रूपये किंमतीचे जनावरे हे नमुद आरोपीच्या ताब्यात मिळून आले. ते जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपी यांचे विरुध्द उमरगा पोलीस ठाणे गुरनं 660/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 कलम 5,5 (ब) सह प्राण्यांना निर्दयतेने वागवणे अधिनियम 1960 कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबी येथे फरार आरोपीस अटक
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे आणखी एका पथक मालाविषयी गुन्हे करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असता सदर पथकास गोपनीय माहिती मिळाली की, अंंबी पोलीस ठाणे येथे सन 2001 साली दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी तुकाराम उर्फ तुक्या सुर्यभान काळे रा. पांढरेवाडी ह.मु. फक्राबाद ता. जामखेड, जि. अहमदनगर हा पुन्हा अंबी पोलीस ठाणे हद्दीत आल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पथकाने सापळा रचून नमुद आरोपीस ताब्यात घेतले. त्यास अंबी पोलीस ठाणे येथे हजर केले. नमुद आरोपी हा गेल्या 22 वर्षा पासून वॉन्टेड आरोपी होता.
सदर कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि शैलेश पवार, पोलीस हावलदार प्रकाश औताडे, विनोद जानराव, शौकत पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, चालक पोलीस हावलदार महेबुब अरब, पोलीस नाईक बबन जाधवर व पोलीस अमंलदार नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.
