धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नूतन जिल्हा कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री श्री बबनराव घोलप साहेब यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष श्री माधवराव गायकवाड व युवक प्रदेश अध्यक्ष नितीन शेरखाने यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. मराठवाडा कार्याध्यक्षपदी बबनराव वाघमारे यांची तर जिल्हाध्यक्षपदी ॲड. गणपती कांबळे (धाराशिव विभाग), जिल्हाध्यक्षपदी प्रा. गणेश कांबळे (उमरगा विभाग) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मराठवाडा युवक प्रदेश अध्यक्षपदी विकास कदम यांची मान्यवरांच्या हस्ते निवडीची घोषणा केली.

 धाराशिव येथील जत्रा फंक्शन हॉलमध्ये प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, गोपाल बछीरे, रोहिदास बनसोडे, नितीन शेरखाने यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्मकार महासंघाची बैठक झाली. या बैठकीत नूतन जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढील प्रमाणे- जिल्हा सचिव शांतिनाथ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष दत्तोबा शेरखाने, सिकंदर अंगुले, बाबा भातागळीकर, बाळासाहेब वाघमारे, बळीराम बनसोडे जिल्हा संपर्क प्रमुखपदी विकास गायकवाड, जिल्हा संघटकपदी बाळासाहेब बनसोडे, राजू धनशेट्टी, जिल्हा कार्याध्यक्ष पदी भैरवनाथ कानडे सर ,जयपाल शेरखाने सर यांची तर युवा जिल्हाध्यक्षपदी आजिनाथ राऊत (धाराशिव विभाग), सोमनाथ बनसोडे (उमरगा विभाग) तसेच मधुकर बिद्री, जिल्हा युवा कार्याध्यक्षपदी उमेश कांबळे, साईनाथ कांबळे, जिल्हा सहसंघटकपदी संजय शिंदे, जिल्हा कोषाध्यक्षपदी साहेबराव शेरखाने, जिल्हा सरचिटणीसपदी डॉ. केदारनाथ कांबळे, उमरगा तालुकाध्यक्षपदी तानाजी सुरवसे, परंडा तालुकाध्यक्षपदी कानिफनाथ सरपने, वाशी तालुकाध्यक्षपदी मसू महादेव सोनवणे, धाराशिव युवा शहराध्यक्ष पदी अविनाश शेरखाने, युवा अध्यक्षपदी कृष्णा गायकवाड यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा म्हणून आशा दगडु राऊत यांची तर गटई सेल चे जिल्हाध्यक्ष म्हणून शहाजी तुकाराम शेरखाने यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

सदरील कार्यक्रमा वेळी महाराष्ट्र युवा अध्यक्ष नितीन शेरखाने, मराठवाडा कार्याध्यक्ष बबनराव वाघमारे, प्रा. शांतिनाथ शेरखाने, जिल्हा अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायालय वकील गणपती कांबळे, धोंडीराम वाघमारे यांनी  चर्मकार महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसह, निवृत कर्मचारी, पदाधिकारी व नूतन कार्यरणी सदस्यांचा सत्कार  करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन हे युवक प्रदेश अध्यक्ष नितीन शेरखाने यांनी केले. तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे व बबनराव वाघमारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. शांतीनाथ शेरखाने यांनी केले.


 
Top