परंडा (प्रतिनिधी)- अर्जुन रोमन, रा.जगतेवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव, यांची मुलगी नामे जयश्री तिचा विवाह 02.02.2012 मारुती रेवडे, रा. अनाळा, ता. परंडा यांच्यासोबत झाला. सदरील वैवाहिक संबंधातून त्यांना दोन आपत्ती झालेली आहेत. परंतु उभय नवरा बायको मध्ये तणावाचे वातावरण होते. त्यावेळेस राजश्री हिने कौटुंबिक हिंसाचार केला म्हणून दिनांक 12 फेब्रुवारी 2016 रोजी आंबी पोलीस स्टेशन, उस्मानाबाद येथे पती व सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद दिली. तेंव्हापासून ती तिचे आई-वडील यांच्याकडे राहत होती. जयश्री हिचे आई-वडील व जयश्रीचे पती रामा रेवडे यांच्यामध्ये तणावाचे वातावरण होते व त्या संदर्भामध्ये मारुती रेवडे व इतर तीन आरोपी मिळून अर्जुन रोमन राहत असलेल्या पुणे येथे येऊन त्यांना व त्यांच्या मुलास मारहाण केली. त्या अनुषंगाने अर्जुन रोमन यांनी 25 जानेवारी 2017 रोजी चतुर्शिंगी पोलीस स्टेशन, पुणे येथे फिर्याद नोंदवली होती. सदर फिर्यादीला प्रती आघात म्हणून मारुती रेवडे याने पोलीस स्टेशन, परंडा येथे अर्जुन रोमन व इतर तीन विरुद्ध भारतीय दंड विधान अनुसार अनुसार गुन्हा नोंद केला. सदरील दोन्ही कुटुंबांमध्ये केलेल्या तक्रारीमुळे तणावाचे वातावरण होते ते वाढत गेले. परंतु जयश्री व तिच्या दोन मुलांच्या भविष्याचा विचार करून जयश्रीच्या आई-वडिलांनी ती प्रकरणे आपसात मिटवण्याचे ठरवले व त्या अनुषंगाने सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदरील एकमेकांच्या विरुद्ध असलेले गुन्हे आपापसात मिटल्यामुळे जयश्री ही मारुती रेवडे यांच्याकडे नांदण्यासाठी गेली. जयश्री ही मारुती रेवडे यांच्याकडे नांदण्यासाठी गेलेली असली तरी तिला तिच्या आई-वडिलांशी कोणताही प्रकारचा संपर्क ठेवण्यास सक्त मनाई केली होती व मारुती रेवडे हा जयश्री व तिच्या मुलांना घेऊन शेतातल्या घरी राहायला गेला होता. तर त्याचे आई-वडील हे गावातल्या घरी राहत होते. मुलांच्या भविष्याचा विचार करून मारुती यांचा मानसिक व शारीरिक त्रास सहन करून तिथेच राहत होती. परंतु त्यांच्यामध्ये खूप तणावाचे वातावरण होते. अशातच दिनांक 06.04.2026 रोजी ती ती बेपत्ता झाली. सदरील महिला बेपत्ता होण्याच्या दिवशी सदरील महिलेची दोन्ही मुले मारुती रेवडे यांनी त्यांच्या गावातील घराकडे म्हणजेच आजी-आजोबाकडे पाठवलेली होती. मारुती रेवढे यांनी आंबी पोलीस स्टेशन येथे सदरील बेपत्ता झाल्या संदर्भात मिसिंग रिपोर्ट नंबर 05/2026 दाखल केला. त्या संदर्भातील माहिती अर्जुन रोमन म्हणजेच जयश्री रेवडे यांच्या वडिलांना माहिती मिळाली असता त्यांनी पोलीस स्टेशन येथे भेट दिली व त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याचा पूर्ण संशय हा मारुती रेवडे यांच्या वरती घेतला. परंतु सदरील गोष्टीची दखल आंबी पोलीस स्टेशन ने घेतली नसल्यामुळे, अर्जुन रोमन यांनी दिनांक 25 मार्च 2026 रोजी मा. जिल्हाधिकारी तसेच मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना लेखी तक्रार दाखल करून बेपत्ता मुलीच्या शोध घेणे तसेच तपासिका अधिकारी तपास करत नसल्यामुळे तो तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यासंदर्भात विनंती केली असता, त्यावरही कुठलाच निर्णय घेतलेला नाही. शेवटी अर्जुन संतू रोमन हे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, संभाजीनगर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन त्यांच्या बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात यावा व आंबी पोलीस स्टेशन हे तपासामध्ये सहकार्य करत नसल्यामुळे त्यांच्याकडे चा तपास काढून घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा अशा स्वरूपाची विनंती केली. अर्जुन यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये आपल्या मुलीचे काही बरे वाईट झाले असण्याची सुद्धा शंका व्यक्त केली व तसे असेल तर त्यामागे मारुती रेवडे हाच असेल असा संशय ही व्यक्त केला, परंतु सदरील तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही. अर्जुन संपत रोमन यांनी वारंवार मा. जिल्हाधिकारी, धाराशिव व पोलीस अधीक्षक, धाराशिव तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, छ. संभाजीनगर यांना वारंवार विनंती करूनही त्यांच्या बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात पोलीस अयशस्वी ठरले. तसेच, त्यांनी पोलीस तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यासंदर्भात केलेली विनंती ही ग्राह्य धरली नाही, म्हणून अर्जुन रोमन यांनी मा. उच्च न्यायालयाचे यायचे ठरवले व त्या संदर्भात त्यांनी ॲड सुशांत चौधरी यांच्यामार्फत याचिका सादर करून बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासंदर्भात, तपास अधिकाऱ्यांना आदेशित करावे तसेच सदरील तपास अधिकाऱ्यांकडे तपास हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपुर्त करावा, या संदर्भात याचिका दाखल केली. सदरील याचिकेवर दिनांक 8 जुलै 2026 रोजी सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालयाने संबंधित प्रतिवादींना नोटीस काढून 22 जुलै 2026 रोजी हजर होण्याचे आदेश केले. तसेच, पुढील तारखेपर्यंत बेपत्ता महिलेचा तपास करून तिला पुढील तारखेपर्यंत मा. उच्च न्यायालयासमोर हजर ठेवण्याचे आदेश प्रतिवादींना केले.


 
Top