तुळजापूर (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने  जाणुन बुजुन कांदा निर्यात बंदी  व इथेनाँल निर्मिती बंदी करुन शेतकऱ्यांना अर्थिक  संकटात टाकण्याचे काम केले सरकारने 2024 जवळ आले आहे याचे भान राखावे असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे मंगळवार दि.12 डिसेंबर रोजी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजीत रस्ता रोको आंदोलना दरम्यान दिला. स्वाभीमानी शेतकरी संघटना  कांदा निर्यात बंदी विरोधात आक्रमक बनली असुन, कांदा निर्यात बंदी मागे घ्या व जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी येथील महामार्ग रस्तावरील जुन्या बसस्थानक चौकात मंगळवार दि.12 डिसेंबर रोजी रस्तावर कांदा ओतुन रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी आंदोलकासमोर बोलताना जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे म्हणाले कि, केंद्र सरकारने जाणुन बुजुन कांदा निर्यात बंदी व इथेनाँल निर्मिती बंदी करुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप  केला. शेतकऱ्यांना दोन हजार दिले कि काम संपले असे हे सरकार वागत आहे. पिकविमा अनुदान हा फक्त कागदपञी खेळ असल्याचा आरोप केला. सरकारने कांदा निर्यात बंदी नाही उठवली व दुष्काळ जाहीर न केल्यास शेतकऱ्यांचे लेकरे पुन्हा स्वाभीमानी शेतकरी संघटना नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरतील नंतर होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील  असा इशारा यावेळी दिला. स्वाभीमानी शेतकरी संघटना कार्यकते जुन्या बसस्थानक चौकात येवुन चारी बाजुचे रस्ते अडवुन रस्ता रोको आंदोलन केले.             

यावेळी जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजणे, राजाभाऊ हाके, कल्याण भोसले, अभि सांळुके, चंद्रकांत सांळुके, शहाजी सोमवांशी, विजय सिरसठ, नागेश कोल्हे, योगेश रोगे, अभिमान्यु मातोळे अदि पदाधिकारीसह  हजारो शेतकरी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top