तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजातील महिला चुल मुल व शेती कामे पुरतीच मर्यादीत असणाऱ्या ग्रामीण भागातील महिला प्रथमच विक्रमी संखेने या सभेसाठी उपस्थितीत राहिल्याने आगामी मराठा आरक्षण संघर्षात महिलाचा वाढता टक्का वाढतोय. हा मराठा आरक्षणला बळ देणार ठरण्याची शक्यता आहे. सभा यशस्वीतेसाठी प्रथमच माकणी करजखेडा ता. लोहारा सारख्या अतिशष ग्रामीण भागात मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण साठी झालेल्या सभेस शेती, घरचे कामे सोडुन समाजातील महिला चुल, मुल व कुणबीचे कामे सोडुन रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी प्रचंड संखेने महिला, मुली उपस्थितीत राहिल्या. मराठा आरक्षण संघर्ष ठिणगी आता ग्रामीण भागात घरोघरी पोहचल्याचे दिसुन येते. यामुळे पुरुषांबरोबर आता महिला ही या संघर्षात सहभागी झाल्याने आरक्षण धग वाढणार असल्याचे दिसुन येत आहे.
या सभेत महिला सहभागी झाल्याच तसेच मुली व महिलांनी सभेत मोठे योगदान असल्याचे बोलले जाते. या सभेचे नियोजन पन्नास टक्के महिला व मुलीनी पेलल्याचे दिसुन आले. ग्रामीण भागातील महिलांची प्रचंड उपस्थिती व प्रथमच सभा यशस्वी ते साठी घेणारे परिश्रम पाहुन मराठा समाज बांधव अवक झाले. या सभेत प्रकृती अवस्थामुळे मनोज जरांगे पाटील यांनी कडक उन्हात उभे राहुन भाषण करीत असताना अचानक ञास होवु लागल्यामुळे बसुन भाषण केल्याने या घटने वरुन माहिला प्रचंड भावनिक झाल्याचे दिसुन आले.
