धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटा) चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र क धुरगुडे यांच्या उपस्थिती मध्ये दि. 24 डिसेंबर रोजी शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते भास्कर खोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.सुरेश दाजी बिरादार यांच्या संकल्पनेतून भूम, परंडा, वाशी येथील युवक व युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी पन्नास हून अधिक कंपन्या आज या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. या मेळाव्यासाठी युवक युवतींनी नोंदणी केली व मुलाखती दिल्या. या रोजगार मेळाव्यासाठी भरघोस असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
मेळाव्याच्या उद्घाटना प्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपल्या भूम, परंडा, वाशी येथील युवक व युवतींसाठी ही मोठी रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले. येणाऱ्या पुढील काळामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये रोजगार मेळावा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले भव्य रोजगार मेळाव्यामध्ये ज्या युवक युवतींची निवड झाली त्यांच्याशी जिल्हाध्यक्ष यांनी संवाद साधला. ज्या युवक व युवतींना पुण्यामध्ये राहण्याची सोय नाही अशांसाठी वस्तीगृहाची सोय करून देऊ असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी मेळाव्यासाठी सहभागी असणाऱ्या सर्व युवक युवतींना मार्गदर्शन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्याप्रसंगी मान्यवर यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले.निवड झालेल्या युवक व युवतींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
या मेळाव्या प्रसंगी, ॲड.प्रवीण यादव,भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, भूम तालुकाध्यक्ष ॲड. रामराजे साळुंखे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, भूम शहराध्यक्ष जीवन दादा गाढवे, सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत शिंदे, सामाजिक न्याय विभागा प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,जगदीश पाटील,वाशी युवक अध्यक्ष बाळासाहेब काटवटे, धाराशिव युवक अध्यक्ष बालाजी शिंदे, भूम युवक तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ,वाशी नगरसेवक भागवत कवडे, भूम तालुका कार्याध्यक्ष संदीप गटकळ, तुळजापुर तालुका उपाध्यक्ष गोविंद देवकर, शिवसेना तालुका अध्यक्ष जाधवर, प्राचार्य शिंदे, प्राचार्य चंदनशिवे, शिवाजी गाढवे, आदिल शेख, बालाजी शिर्के, रणजीत साळुंखे, केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी उपस्थित होते.