भूम (प्रतिनिधी) -यात्रा कालावधीत बँनर लावताना परवाना काढल्याशिवाय बँनर लावु नये असे आवाहन यात्रेच्या नियोजनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रशासकिय बैठकीत तहसिलदार सचिन खाडे यांनी केले आहे. दि. 22 डिसेंबर रोजी श्री आलमप्रभू देवस्थान यात्रेच्या नियोजना संदर्भात प्रशासनाची बैठक घेण्यात आली. तालुक्याचे ग्रामदैवत श्री क्षेत्र आलमप्रभू देवस्थानची यात्रा 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत होत असून या अनुशंगाने प्रशासनाची व देवस्थान ट्रस्ट यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. दरवर्षी शहरात विविध पक्षाकडून शहरात ठिक ठिकाणी बँनर लावले जातात ते कुठे लावावेत याचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे बँनर लावाताना पालिका प्रशासन महसुल प्रशासन व पोलिस प्रशासन या तीन कार्यालयाची परवानगी घेवुनच हे बँनर लावले जाणार. परवानगी न घेता बँनर लावल्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बैठकित ठरले आहे. 

यात्रेच्या अनुशंगाने देवस्थानकडे जाणार्या रोडवरुन जड वाहणास बंदी करण्यात आली. दुचाकीस मनाई करण्यात येणार असून हा रोड फक्त भाविकांसाठी सुरु राहणार आहे. या ठिकाणी पोलिस प्रशासनाकडुन बँरेगेट लावण्यात येणार आहेत. यात्रेसाठी जी दुकाने लागतील अशा दुकानदारांनी लाईटची जोंडणी काळजीपुर्वक करण आवश्यक असून याची पाहणी विजवितरण कंपनी यांनी करावी अशा सुचना विज वितरण कंपनीला दिल्या आहेत. यात्रा कालावधीत देवस्थान ठिकाणी विजवितरण कंपनी कर्मचारी यांची नेमनुक करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत स्वच्छतेला महत्व दिल जाणार आहे. यात्रा परिसरात व देवस्थान ठिकाणी स्वच्छता कर्मचारी यांची नेमनुका करुन घंटागाडी तैनात करण्यात येणार आहेत. श्रीक्षेत्र आलमप्रभू देवस्थान येथे एका रुग्नवाहिका तैनात राहणार आहे. देवस्थान ठिकाणी वैद्यकिय अधिक्षक एन. बी. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या बैठकिस तहसिलदार सचिन खाडे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी आलमप्रभू देवस्थानचे अध्यक्ष दिलीप शाळु, रवि टेकाळे, श्रीकांत दिक्षीत, आबासाहेब मस्कर, राहुल पवार, संतोष सुपेकर तसेच वकिल मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थिती होते.


 
Top