तुळजापूर (प्रतिनिधी)- अयोध्यात प्रभुरामचंद्र सानिध्यात पुजन केलेला अक्षदा कलश सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी तिर्थक्षेञ्त्र तुळजापूरला आणण्यात आल्यानंतर हा कलश देवीचरणी ठेवुन पुजन करण्यात आले. या अक्षदा कलशातील अक्षदा आता श्रीराम मंदिर उदघाटन सोहळ्याच्या निमंत्रण पार्श्वभूमीवर वाटप करण्यात येणार आहे.
अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या प्रभु श्रीरामचंद्र राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत श्रीरामचा सानिध्यात मंत्रोच्चाराने पूजन करून पवित्र केलेल्या अक्षतांचा मंगल कलश सोमवारी दि. 4 डिसेंबर रोजी तिर्थक्षेत्र तुळजापूरात दाखल होताच प्रथमता तो श्री तुळजाभवानी तसेच प्रभु श्रीरामचंद्र व श्री शंभुमहादेव मुदगुलेश्वर चरणी ठेवुन पुजन करुन श्रीराम मंदिर उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण रुपी अक्षदा जिल्हाभर वितरीत करण्यासाठी धाराशिवकडे रवाना झाला. या नंतर हा अक्षदा नागरिकांना वाटपाचा कार्यक्रम केला जाणार आहे.
यावेळी देविचे महंत वाकोजीबुवा, विश्वहिंन्दु परिषदेचे विजय वाघमारे, विकास मलबा, बाळासाहेब शामराज, नागेश नाईक. इंद्रजित सांळुके, दिनेश बागल, शांताराम पेंदे, राजेश्वर कदम, सुहास सांळुके, संजय पेंदे सह विश्वहिंन्दू परिषद भाजप पदाधिकारी उपस्थितीत होते.