धाराशिव (प्रतिनिधी)-येथील ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अशोक शंकरराव कुलकर्णी बेंबळीकर यांचे रात्री पुणे येथील खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.
त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या विविध अध्यक्षांकडे संग्रामसिंह माकणीकरांपासून रामेश्वर करंडे पर्यंत स्विय सहाय्यक म्हणून तब्बल 27 वर्ष काम केले. सेवानिवृत्तीनंतर ब्राह्मण सेवा संघाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मान पुरस्कार देखील मिळाला होता. माजी आमदार राहुल मोटे यांचे ते स्वीय सहाय्यकही होते.त्यांच्या पार्थिव देहावर धाराशिव इथे सायंकाळी कपिलधारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.