भूम (प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह धाराशिव येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक प्रदीप डोके यांना दिव्यांग भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना मुंबई 32 यांच्या वतीने देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके, जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मिसाळ, परंडा तालुका कार्याध्यक्ष पांडुरंग चोबे, भूम तालुका कोषाध्यक्ष हनुमंत बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब मुळे व विविध क्षेत्रातील दिव्यांग मान्यवर उपस्थित होते. मान्यवर व सर्व विभागचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


 
Top