धाराशिव (प्रतिनिधी)- दंतसेवा दातांच्या दवाखान्याचे (मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक) चे उद्घाटन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर महंत वाकोजी बुवा व डॉ. एन. आर. मलबा यांच्या हस्ते फीत कापून व दिपप्रज्वलन  करून  करण्यात आले. यावेळी नागेश नाईक, बप्पा जगदाळे, प्रा. श्रीपाद मसलेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 

डॉ. आशुतोष तडवळकर (बीडीएस आणि एमडीएस आर्थेा) यांनी मनोगत व्यक्त केले. दंतसेवा दातांच्या दवाखान्यात दंतरोग, मुखरोग, चेहरा सुंदरीकरण इत्यादी विषयी निदान व उपचार केले जातील असे सांगून वेडेवाकडे दात पीना लावून सरळ करणे, दातांमधील फटी मिटविणे या विषयी विशेष प्राविण्य असल्याची माहिती दिली. याशिवाय तंबाखू सोडविण्यासाठी मार्गदर्शन, क्लेफ्ट ॲड लीप पॅलेट यासाठीची उपचार पध्दती विदित केली. उद्घाटन समारंभास वैद्यकीय क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.


 
Top