धाराशिव (प्रतिनिधी)- युवकांचा सर्वांगीण विकास करणे संस्कृती व परंपरा जतन करणे युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय राज्य स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व कृषी संचलनालय यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे विभाग स्तरीय युवा महोत्सव 2023 दि. 7/12/2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सव मधील स्पर्धेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची कला दाखवण्यासाठी आयोजित स्पर्धेत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव या कॉलेजचे दोन विद्यार्थी जगदीश सुतार (पोस्टर स्पर्धा) व समीर शेख वक्तृत्व स्पर्धा हे सहभागी झाले होते .त्यांना विभाग स्तरावर तृतीय क्रमांक मिळाला.
सदर स्पर्धा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये मिलेट म्हणजेच तृणधान्य यांचे आहारातील महत्त्व व त्याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता आयोजित करण्यात आली. त्यानुसार प्रा. प्रमोद तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश सुतार व समीर शेख यांनी धाराशिव जिल्हा युवा महोत्सव 23 मध्ये सहभाग नोंदवून पोस्टर व वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. याच विद्यार्थ्यांची विभागीय युवा महोत्सव, नांदेड येथील स्पर्धेसाठी निवड झाली. त्यामध्ये तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर जगदीश सुतार यांनी पोस्टरमधुन व समीर शेख यांनी आपल्या भाषणात महत्त्व विषद केले. दोन्ही विध्यार्थ्यांना विभागीय स्तरावर तृतीय पारितोषिक मिळाले आहे. सदर विद्यार्थ्यांचे तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील व संस्था समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.