कळंब (प्रतिनिधी)-श्री गुरु नंदकिशोर शिवाचार्य महाराज सोनपेठ संस्थानच्या वतीने कळंब लिंगायत तेली समाज सेवा भावी संघाचे शहराध्यक्ष सामाजीक  कार्याची दखल घेतअशोक काशिनाथ चिंचकर यांना श्री नंदिकेश्वर महाराज यांच्या वर्धापन दिनानिमित्त “राज्यस्तरीय विरशैव रत्न“ पुरस्कार श्री आद्यमठाध्यक्ष तपस्वी श्री गुरु नंदिकेश्वर शिवयोगी महाराज सोनपेठकर यांच्या पुण्यतिथी महोत्सव व चरपट्टाधिकारी श्री.ष.ब्र.108 श्री गुरु नंदकिशोर शिवाचार्य महाराज यांच्या 23 व्या पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त आयोजित दि.10 डिसेंबर 2023 रविवार रोजी श्री ष.ब्र.108 गुरुवर्य डॉ. शिवयोगी शिवाचार्य महाराज म्हैसाळकर, श्री ष.ब्र.108 गुरुवर्य वीरूपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, श्री ष.ब्र.108 गुरुवर्य अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर कर, श्री ष.ब्र.108 गुरुवर्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणीकर, श्री ष.ब्र.108 गुरुवर्य  चनबसव शिवाचार्य महाराज बरदापुरकर आदी गुरुवर्यांच्या शुभ हस्ते “राज्यस्तरीय वीरशैव रत्न“ पुरस्कार - 2023, स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्रासह महेसुरी फेटा देवून सन्मान करण्यात आला. 


 
Top