धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्याख्यानाचे ऑनलाइन पद्धतीने प्रसारण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत 2047 या विषयावर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचे प्रसारण करण्यात आले. कौशल्य विकास, व शिक्षण क्षेत्राबरोबरच अनेक विषयांवर माननीय नरेंद्र मोदी यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख व सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.


 
Top