धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीयस्तर नवनीत मास्टर स्टोक युवाच्या प्रतिवर्षाप्रमाणे इ.7 वीच्या 192 विद्यार्थी सहभागाने माझे आवडते स्मारक, आवडता खेळाडू, मी कोण होणार या विषयावर विध्यार्थ्यांनी खेळीत चित्र रेखाटून रंगविले.
सदर स्पर्धेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक साहेबराव देशमुख , उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, 7वीचे पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, कला विभागप्रमुख शिवाजी भोसले, पर्यवेक्षक कलाध्यापक धनंजय देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी कलाध्यापक शेषनाथ वाघ, सहशिक्षक भारत गवळी, विठ्ठल लोमटे, श्यामराव राठोड , किशोर लामतुरे , नरसिंग साळूंके , सुरेंद्र पडवळ, शिपाई टिपू शेख यांनी परिश्रम घेतले.
