तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी देवीच्या 207 किलो सोने व 2 हजार 570 किलो चांदी वितळवण्याच्या प्रक्रियाला उच्च न्यायालयाच्या दोन न्यायायाधीश यांच्या खंडपीठने स्थगिती दिली आहे.
विधी व न्याय विभागाने तुळजाभवानी मंदीर संस्थानला सोने, चांदी वितळवायला नुकतीच परवानगी दिली होती. मात्र त्याला अँड. शिरीष कुलकर्णी व पुजारी मंडळ माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी सदरील सोनेचांदी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने वितळवणे प्रक्रिया थांबविण्याची मागणी श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तरीही त्यांनी ती थांबवली नव्हती वितळवणे प्रक्रियाला काही भाविक, पुजारी यांचा विरोध होता. त्यानंतर हिंदू जनजागरण समितीने कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. तब्बल 13 वर्षानंतर राबवली जाणार होती सोने वितळविणे प्रक्रिया मात्र आता त्याला पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली आहे. भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे. 1 जानेवारी 2009 ते 10 जुन 2023 या दरम्यान जमा झालेल्या सोने चांदी वितळविनेस सरकारने अद्यादेश काढून परवानगी दिली होती. कोर्टाने पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली असुन, सुनावणी आता 9 जानेवारी 2024 ला होणार आहे.
.jpg)