तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री. तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सोमवार दि. 11 डिसेंबर रोजी देवीजींच्या जामदार खान्यात पुर्न तपासणी वेळी लोखंडी पेट्यात सापडला असल्याचा दावा सोने मोजनी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे उपाअध्यक्ष विपीन शिंदे यांनी केला आहे.
तुळजाभवानी मंदिरातील लोखंडी पेटीत हा मुकूट सापल्याची माहीती मिळली आहे. 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट गायब मोजनी समितीच्या अहवालात सांगण्यात आले होते. श्रीतुळजाभवानी मंदिरातील सोन्याचा मुकूट गायब प्रकरणी आरोप निश्चित करण्यासाठी समितीची चर्चा चालु होती. यात कागदपत्रे तपासताना त्या पेटीची चर्चा झाली. सदरील पेटी खोलण्यासाठी सोने, चांदी मोजदाद समितीला सोमवार दि. 11 डिसेंबर रोजी बोलवण्यात आले. नंतर आज समितीने ती लोखंडी पेटी खोलली असता त्यात गायब सोन्याचा मुकुट दिसला. त्यानंतर 1973 चे सोन्याच्या मुकुटाचा फोटो पाहुन गायब मुकुट व या मुकटात बरेच साम्य आढळुन आल्याने हा तोच मुकुट असावा असा दावा केला जात आहे. सदरील सोन्याचा मुकुटगायब वृत्त वृत्तपञात बातमी प्रसिध्द होताच सदरील गायब मुकुट सापडल्याच्या चर्चने भाविकांसह सर्वञ खळबळ उडाली असून, मंदीर प्रशासन या बाबतीत काय माहीती देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
आजच मुकुट सापडणे आश्चर्य ? - गंगणे
गायब मुकुट प्रकरणी आज आरोप निश्चित होवुन गुन्हे दाखल होणार होते. तर आजच मुकुट सापडणे हे आश्चर्य असल्याची प्रतिक्रिया पुजारी मंडळ माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी दिली.
