धाराशिव (प्रतिनिधी)-धनगर समाजाचे नेते. आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ओबीसी जनमोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करुन तत्काळ अटक करावी अशी मागणी आज (दि.12) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाप्रमुख सचिन शेंडगे, ॲड.खंडेराव चौरे, महेश देवकते,उमेश मोराळे, उमाकांत सानप, संतोष वतने,लक्ष्मण माने,  प्रभाकर सारुक, शिवाजी सारुक, शौकत सय्यद, चत्रभुज बांगर, गणेश एडके (गावसुद) अशोक गाडेकर, गणेश एडके (भंडारवाडी )नवनाथ सोलंकर, ओंकार देवकते, अमोल घोळवे, सुरज ठोबरे, दत्ता घोळवे यांच्यासह ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top