परंडा (प्रतिनिधी) - पेट्रोलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कामगारास काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना दि.27 डिसेंबर रोजी परंडा-करमाळा रोडवर असलेले हनुमंत पाटील यांच्या मेघराज पेट्रोलपंपावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी परंडा पोलीस स्टेशनमधे पाच आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा रोडवरील मेघराज पेट्रोलपंप येथे मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल भरल्यानंतर आरोपीनी राहूल चौतमहाल या कामगारास पैसे मागितल्याच्या कारणावरून मारहाण केली. याप्रकरणी  चौतमहाल यांच्या फिलीदी वरून डोमगाव येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top