धाराशिव (प्रतिनिधी)-देशभरात नमो चषकच्या माध्यमातुन भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने क्रिडा प्रेमींसाठी एक पर्वणी उपलब्ध करुण देण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या हस्ते नमो चषक लोगोचे अनावरण धाराशिव- कळंब व तुळजापूर विधानसभा येथे करण्यात आले. नमो चषकातील विविध क्रिडा व सांस्कतीक स्पर्धसाठी नोंदणी करण्यास सुरूवात करण्यात आली.

भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा धाराशिव यांच्या वतीने संपूर्ण धाराशिव जिल्हयातील भुम-परंडा-वाशी, कंळब-धाराशिव, तुळजापूर, उमरगा-लोहारा या विधानसभा क्षेत्रामध्ये गाव पातळी पासुन क्रिकेट, फुटबॉल, बुध्दीबळ, कॅरम, कबड्डी, खो-खो, कुस्ती, धावणे, व्हॉलीबॉल, चित्रकला, रांगोळी, गीत गायन, वकृत्व स्पर्धा अशा विविध क्रिडा व सांस्कृतीक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेच्या नोंदणी दि. 29 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 पर्यत असणार आहे. व प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरूवात 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2024 पर्यत कार्यक्रम होणार आहेत. 27 जानेवारी रोजी बक्षीस वितरण होणार आहे.

या लोगा अनावरण प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, लोकसभा निवडणुक प्रमुख नितीन काळे, अशोक भाऊ शिंदे, विजय आण्णा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित कव्हेकर पाटील, नेताजी पाटील, अस्मीता कांबळे, प्र.का.स  विनोद गपाट, प्रविण पाठक, सतिष बप्पा देशमुख, सरचिटणीस, इंद्रजित देवकते, प्रदिप शिंदे, मंडळाध्यक्ष अजित पिंगळे, राजभाऊ पाटील, अभय इंगळे यांच्या सह भारतीय जनता युवा मोर्चा चे पदाधीकारी, कार्यकर्ते व खेळाडु मोठ्या संख्येने उपस्थीत होते. हे नमो चषक प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब ,सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर व लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात व माजी आ. सुजीतसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात येत आहे.  भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी सर्व खेळाडुंना या धाराशिव जिल्ह्यातील नमो चषका मधील विविध क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा असे आवाहन केले.


 
Top