उमरगा (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आयएमओचे अध्यक्ष डॉ. अनंत मुगळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शकुंतला मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मठपती, सदानंद शिवदे पाटील, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे, विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, केंद्र प्रमुख अमोल थोरे, यावेळी बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत मोरे, अभियंता संजय सरपे, रवी कदेरे, अनिल मदनसुरे यांनी उमरगा ते रामेश्वर हा पंधराशे किलोमीटरचा प्रवास सायकल वरून यशस्वी केल्याने त्यांचा खास सत्कार करण्यात आला. 

या स्पर्धेत उमरगा व आष्टा केंद्रातील सर्व शाळेने सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बाबुराव पवार, धनराज तेलंग ,सदानंद कुंभार संजय रूपाजी सोनाली मुसळे ममता गायकवाड यांनी परिश्रम घेतले. तर पंच म्हणून व्यंकट क्षीरसागर. डी. एम. औरादे, विजय घोडके, हरी जाधव  यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर सूत्रसंचालन सरिता उपासे यांनी केले. आभार प्रदर्शन शिल्पा चंदनशिवे यांनी मांनले. यावेळी उमरगा व आष्टा केंद्रातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top