धाराशिव (प्रतिनिधी)-प्रकाश बनसोड यांच्या आई स्मृतीशेष देवकाबाई बापुरावजी बनसोड यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळा दि. 24 डिसेंबर 2023 रोजी न्यू रोशन सेलिब्रेशन हॉल, आर्वी, जिल्हा वर्धा येथे घेण्यात आला.
या पुरस्काराचे संयोजक प्रकाश बनसोड हे फक्त कवितासंग्रहासाठी पुरस्कार देतात. देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन पुरस्कार दिले जातात. त्यातील पंडित कांबळे यांच्या “पेटलेल्या शहराच्या कल्लोळात“ या कवितासंग्रहाला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. माजी आमदार अमर भाऊ काळे, गझलकार संजय इंगळे, प्रा. मनोहर नाईक, विद्यानंद हाडके, प्रफुल भुजाडे, संयोजक प्रकाश बनसोड यांच्या हस्ते पंडित कांबळे व लीना कांबळे यांचा सपत्निक शाल ,स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व बुके देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बाळाभाऊ जगताप, प्रा. पंकज वाघमारे, प्रा. प्रशांत धनवीज, प्रशांत ढोले, प्रीती वाडीभस्मे हे उपस्थित होते.