नळदुर्ग (प्रतिनिधी)- जागतिक पातळीवरील आल्पर-डॉझर सायंटिफिक इंडेक्सने जाहीर केलेल्या वर्ल्ड सायंटिस्ट अन्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग-2024 या क्रमवारीत  सलग दुसऱ्यांदा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. उद्धव भाले यांचा कृषी व वने/ वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये संशोधक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

या रॅकिंगमुळे जागतिक स्तरावर विद्यापीठासह महाविद्यालय व संशोधक प्राध्यापकांना मानाचे स्थान मिळते. द वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रैंकिंग 2024 ची यादी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. भाले यांचे 165 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिंबध प्रकाशित झालेली आहेत. आहेत. सध्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर ऍग्रो केमिकल्स, पेस्टिसाइडस हॉर्टिकल्चर आणि अग्रिकल्चर या विषयाच्या आडव्हाक बोर्ड ऑफ स्टडीचे सदस्य आहेत. ते महाविद्यालयामध्ये अजूनही सातत्याने संशोधन व संशोधन विषयक लिखाण करीत आहेत. याबद्दल डॉ. भाले यांचे बालघाट शिक्षण संस्थांचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगावकर, संस्थेचे सर्व संचालक व प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांच्यासह विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


 
Top