धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.01.12.2023 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वप्नील लोखंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नळदुर्ग परिसरात अवैध मद्य विक्री चालू असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस पथकाने कारवाई करत 4 लाख 31 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व संबंधित आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, येडोळा व लोहगाव गावाचे हद्दीत गावठी हातभट्टी दारु गाळण्याच्या भट्टया सुरु आहेत. अशी माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांना माहिती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पथक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी जावून छापा मारला. येडोळा व लोहगाव शिवारात राजु धोंडीबा राठोड, वय 33 वर्षे, संजय सिध्दु राठोड, वय 40 वर्षे, जालींदर रेवण पवार, वय 50 वर्षे, लक्ष्मी प्रकाश आडे सर्व रा. येडोळा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे सर्वजन 4,600 लि. गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिकद्रव्य हे जवळ बाळगलेले मिळून आले. तसेच गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नाश करण्यात आला. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4 लाख 31 हजार 300 रूपये आहे. आरोपीविरूध्द नळदुर्ग पोलीस स्टेशन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधीकारी निलेश देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे, सुरज देवकर, पोलीस उपनिरीक्षक संजय झराड, तसेच पोलीस ठाणे नळदुर्ग पोलीस अंमलदार, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग धाराशिवचे पोलीस निरीक्षक कवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे, पोलीस उपनिरीक्षक पवन मुळे, यांचे पथकाने केली आहे.