तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील लातुर रस्त्यावर एकमेव बसस्थानकात जाताना येताना चक्क घाण सांडपाण्यातुन ये-जा करावे लागत आहे. भाविक प्रवाशांनामधून या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरी बसस्थानक समोरील गटारगंगा बंद करण्याची मागणी भाविक प्रवाशांमधुन केली आहे.  

तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्गावर नसल्याने सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब वर्गातील भाविकांना एस. टी. ही एकमेव प्रवासासाठी पर्याय उपलब्ध आहे. सध्या बसस्थानक समोर महामार्ग रस्ता काम अपुर्ण आहे. या पार्श्वभूमीवर सांडपाणी जाण्यासाठी रस्ता नाही. तसेच बसस्थानक शेजारी असणाऱ्या भागातील सांडपाणी हे बसस्थानक समोरुन वाहत आहे. यातुनच भाविक प्रवासी, विद्यार्थ्यांना ये-जा करावा लागत आहे. यामुळे भाविक प्रवासी, विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्या उदभवत आहेत. ही समस्या मागील वर्षापासून जैसे थे आहे. माञ यातुन गेली अनेक वर्षापासून मार्ग निघत नाही. यात प्रवाशी माञ नाहक भरडला जात आहे. भाविक प्रवाशांना तिर्थक्षेञ अच्छे दिन कधी येणार की नाही असा सवाल प्रवाशांमधुन व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या बसस्थानकाला स्वछता पुरस्कार दिला गेला आहे. यामुळे हा पुरस्कार संशयाचा भोव-यात सापडला आहे.


 
Top