तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे भातंब्री येथील गटनंबर 59.60 च्या मोजणी विषयी उप-अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय, तुळजापुर यांच्या मनमानी कारभारास कंटाळुन शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन भातंब्री येथील शेतकऱ्यांनी दिले.
ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य व शेतकरी शिवाजी गोरोबा दांगट, व समस्त मौजे भातंब्री येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रायखेल येथील शेतकरी भातंब्री येथील शेतरस्ता कामात गैरप्रकार करीत असल्याचे निर्देशास येत आहे. या कार्यालयातील कर्मचारी व्यवस्थीत काम करीत नसून, शेतकरी वर्गामध्ये भांडण लावण्याचा प्रकार करीत आहेत. गेली अनेक वर्षापासुन एक बांध फिक्स करण्याचे काम करीत नसुन यामुळे मशागतीची काम रखडली असून, कामचुकारपणा करीत आहेत. असे अनेक प्रकार तालुक्यातुन उघडकीस येत आहेत. तरी आमच्या प्रकरणात योग्य ते काम करावे अन्यथा या मागणीसाठी दि. 22 डिसेंबर रोजी या कार्यालयास शेतकरी वर्ग टाळे ठोको आंदोलन करेल. यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा लेखी निवेदनातून इशारा दिला आहे. या निवेदनावर शेतकरी शिवाजी दांगट, तात्या रोडे, विठल दांगट, भगवान दांगट, भारत दांगट, सुरण दांगट, नाना दांगट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.