भूम (प्रतिनिधी)-शहरातील रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आजी आजोबा दिवस विविध उपक्रमांंनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांबळे व अनेक आजी-आजोबा उपस्थित होते. 

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गाण्यांवर नृत्य सादर करत आजी-आजोबांसह पालकांची मने जिंकली. विद्यार्थी शौर्य बारस्कर, आस्था गिलबिले यांनी आजी-आजोबांविषयी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी आयुर्षी वेदपाठक हिने आजी-आजोबा व नातवंडांचे नाते अधिक घट्ट करणारी कविता सादर केली. तसेच काव्या पाटील या विद्यार्थिनीने योगाचे चित्तथरारक सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात आजी-आजोबा यांच्या स्पर्धा घेत व बक्षिसे देण्यात आली. यामध्ये बॉल पासिंग, फुलांचा हार पासिंग आदी मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. आजी-आजोबांनी नातवंडाप्रतीचे प्रेम त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. उपस्थित सर्व आजी-आजोबांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापक हरिश धायगुडे, मुख्याध्यापिका शीतल बावकर,भाग्या जैन, नरुटे, प्रकाश आकरे, अशोक कोळेकर व अमोल वरळे, शिक्षक व व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मिनल गायकवाड व आराध्या लाखे यांनी केले. तर मुख्याध्यपिका भाग्या जैन यांनी आभार मानले.


 
Top