उमरगा (प्रतिनिधी)- येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आदर्श आमर कोथिबीरे यांची अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज युवा संघटनेच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे

संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री रमेश जाधव यांनी श्री आदर्श कोथिंबिरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून नुकतीच एका पत्राद्वारे त्यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या हिंदू खाटीक समाज संघटनेच्या तालुका सचिवपदी ही कार्यरत आहेत. हिंदू खाटीक प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार क्रपाल तुमाने, आमदार राजीव पारवे यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे.


 
Top