धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सौ आशा सुरवसे राऊत तर कार्याध्यक्षपदी सौ जनाबाई कापसे यांची दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी धाराशिव येथे सर्वानुमते निवड करण्यात आली.

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राज्यप्रवक्ते रोहिदास बनसोडे महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष नितीन बाप्पा शेरखाने यांच्या उपस्थितीत सदर निवड जत्रा फंक्शन हॉल धाराशिव येथे पार पडले. कार्यक्रमात अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण नॅशनल एक्सलन्स टीचर अवॉर्ड 2023 हा पुरस्कार मिळाला म्हणून आशा सुरवसे राऊत यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या आज पर्यंतच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात केलेले योगदान लक्षात घेऊन समाजासाठी कार्य करण्यासाठी या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौ कापसे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांनी समाजासाठी कार्य करावे म्हणून ही नियुक्ती करण्यात आलेली आहे.


 
Top