परंडा (प्रतिनिधी) - बावची विद्यालय परंडा येथे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पाच दिवशीय शिक्षक प्रशिक्षण पहिला टप्पा संपन्न झाला.

स्टार प्रकल्प व निपुण भारत कार्यक्रमांतर्गत तसेच नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार अगामी काळात भविष्यवेधी शिक्षण कसे असेल? पालक, विद्यार्थी, शिक्षक, शाळा, समाज या स्तरावर येणारी नविन विविध आव्हाने, आणि क्षणा-क्षणाला बदलणारे जग, या विश्वातील भविष्यवेधी शिक्षण कसे असेल.? या अनुषंगाने देश, राज्य ते शहरी-ग्रामीण भागातील शाळेत घडणारी मुले यांना जगाच्या स्पर्धेत टिकवायचे असेल तर अगोदर शिक्षकांना बदलत्या शिक्षण प्रकियेतील संकल्पना, ध्येय, उद्दिष्टे माहिती होणे आवश्यक आहे. म्हणून या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव व शिक्षण विभाग, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व जि.प. शाळा व खाजगी अनुदानीत शाळेतील इ.1ली ते 8 वी ला शिकविणाऱ्या शिक्षकांना हे प्रशिक्षण एकूण 5 टप्प्यात देण्यात येत आहे. पैकी पहिला टप्पा दि. 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2023 या कालावधीत बावची विद्यालय, परंडा येथे एकूण 114 शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी परंडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांचे मार्गदर्शनानुसार, व सर्व विस्तार अधिकारी सूर्यभान हाके, आशोक खुळे, शिवाजी काळे, दादासाहेब घोगरे, साधनव्यक्ती अरविंद बाराते यांच्या नियोजनानुसार घेण्यात आले. विभागस्तर लातूर येथे हे प्रशिक्षण घेतलेले केंद्रप्रमुख चंद्रकांत बेळे, बाबासाहेब पाचकुडवे, सचिन केमदारने, तज्ञशिक्षक प्रदिप खराडे, किरण विभुते, आप्पासाहेब बल्लाळ, साधनव्यक्ती सारिका हेगडकर, बाळासाहेब डोके या सर्वांनी सुलभक म्हणून काम पाहिले. खेळीमेळीच्या वातावरणात हे प्रशिक्षण यशस्विरित्या संपन्न झाले. या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा दि.19 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.


 
Top