धाराशिव (प्रतिनिधी)-त्रैलोक्याचे स्वामी प.पू. श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सनिमित्त पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने गुरूचरित्र पारायण, ग्रंथदिंडी, भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह, महाप्रसाद सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव शहरातील श्री सदगुरू कॉलनी, भानूनगर येथे मंगळवार दि. 19 ते 26 डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे.धाराशिव शहरातील श्री सदगुरू कॉलनी येथे पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठाणच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त गुरूचरित्र पारायण, अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सप्ताहचे यंदा 9 वे वर्षे आहे. मंगळवार, दि. 19 डिसेंबर रोजी स. 10 वा. श्री तुळजाभवानी देविजींचे महंत प.पू. तुकोजी बाबा (तुळजापूर) व रुईभर येथील श्री दत्त संस्थानचे संस्थापक अप्पाबाबा महाराज (रुईभर) यांच्या हस्ते देव-देवतांच्या पूजन विधीने सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. याच दिवशी दु. 1 वा. मुक्ताई महिला भजनी मंडळाची (महात्मा गांधीनगर) भजनसेवा, बुधवार, दि. 20 डिसेंबर रोजी रुक्मीणी महिला भजनी मंडळाची (बँक कॉलनी) भजनसेवा, गुरूवार दि.21 रोजी सखी महिला भजनी मंडळ (टीपीएस रोड, यशवंत नगर) , शुक्रवार दि. 22 रोजी लक्ष्मी नारायण महिला भजनी मंडळ (सांजा चौक), शनिवार दि. 23 रोजी संत जनाबाई महिला भजनी मंडळ (शांतीनिकेतन कॉलनी), रविवार, दि.24 रोजी माऊली महिला भजनी मंडळ (गणेश नगर), सोमवार, दि. 25 रोजी दु. 1 वा. गणगण गणात बोते मंडळ (पोस्ट कॉलनी) व सायं 4 वा. गजानन महिला मंडळाची(पोस्ट कॉलनी) भजन सेवा तर सायं. 6 वा. शिवकुमार मोहेकर यांचा भजनसंध्या कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. 26 रोजी स. 10 वा. रामायणाचार्य, हभप भारत कोकाटे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी स. 8 वा. गुरूचरित्र ग्रंथ दिंडी तर दु. 12 वा. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. यानंतर महाप्रसाद वाटपाने या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. या सप्ताह सोहळ्याचा भाविक -भक्त, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने धनंजय रणदिवे यांनी केले आहे.


 
Top