धाराशिव (प्रतिनिधी)-एस. टी. बसस्थानकाचे 51 वर्षापूर्वीचे बांधकाम पाडण्यास गेल्या दोन दिवसापासून पाडण्यास सुरूवात झाली असून, पूर्ण बांधकाम पाडल्यानंतर येत्या 8 दिवसात नवीन बसस्थानकाचे भूमीपूजन साध्या पध्दतीने होणार आहे. 

धाराशिव बसस्थानकाची जुनी इमारत 1972 मध्ये बांधली होती. या इमारतीला आता 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे इमारतीचे बांधकाम कमकुवत झाल्यामुळे पावसाळ्यात छताला गळती लागत असत. त्यामुळे प्रवाशांसह एस. टी. कर्मचाऱ्यांनाही कसरत करावी लागत होती. विकसनसिल धाराशिवमुळे सध्याचे बसस्थानकही अपुरे पडत होते. नवीन बस गाड्यांची संख्या वाढल्यामुळे नव्या बसस्थानकाची गरज निर्माण झाली होती. राज्य सरकारने स्व निधीतून या बांधकामास मंजुरी दिली. त्यासाठी 10 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 7 कोटी 57 लाख रूपयाची तरतूद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात वाहनतळ, कॉक्रीटीकरणासाठी 3 कोटी 77 लाख रूपये मिळणार आहेत. नवीन बसस्थानकाचे काम पूर्ण करण्याची मदत दीड वर्षे असली तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून हे बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती एस. टी. महामंडळाचे विभागीय अभियंता शशिकांत उबाळे यांनी पु.वि. लोकराज्यशी बोलताना दिली. सध्या बसस्थानक परिसरात दक्षिण दिशेला तातपुरते निवारा शेड उभारण्यात आले आहे. तेथूनच सध्या धाराशिव बसस्थानकाचे कामकाज चालू आहे. 


धाराशिव बसस्थानकाचे पाडकाम दोन दिवसात पूर्ण होवून पाडकामचे पडलेले साहित्य उचलण्यासाठी चार दिवस लागतील. त्यानंतर येत्या 8 दिवसात साध्या पध्दतीने भूमीपूजन होवून नवीन बसस्थानकाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल. नवीन बसस्थानकाच्या काम पूर्ण झाल्यानंतर व्यापारी गाळ्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. 

-शशिकांत उबाळे, एस. टी. महामंडळाचे विभागीय अभियंता.



 
Top