धाराशिव (प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एम. पी. डी. ए. कायद्या अंर्तगत नियेाजित स्थानबध्द इसम नामे अविनाश दिलीप भोसले वय 24 वर्षे, रा.गायरान वस्ती, पाटोदा ता.जि.धाराशिव यास ताब्यात घेणेकरीता धाराशिव शहरातील साठे नगर याठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यास ताब्यात घेते वेळीस त्याने स्वत:चे शरीरावर चाकुने मारुन घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सदर आरोपीस उपचारार्थ शासकीय रूग्णालयात दाखल केले असता तेथूनही त्याने पळ काढला होता. अखेर स्थानिक गुन्हा शाखेने दमदार करवाई करत एमपीडीए कायदाअंतर्गातील आरोपी अविनाश दिलीप भोसले यास बार्शी तालुक्यातील जेरबंद केले.
याबाबत अधिक वृत्त असे की, दि.15/12/2023 रोजी रात्री सदरचा नियोजित स्थानबध्द इसम अविनाश दिलीप भोसले हा उपचारादरम्यान रुग्णालयातुन पळुन गेला होता. म्हणुन त्याचेविरुध्द व त्यास पळवुन लावण्यास मदत करणारी त्याची पत्नी चमेली भोसले यांचेवर धाराशिव शहर पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हा रजि नं 463/2023 कलम 224,225 (ब) भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर इसमास ताब्यात घेणेकरीता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे मार्गदशनावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचे शोधात असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सदरचा इसम हा भालगाव, ता.बार्शी जि.सोलापुर याठिकाणी एका शेतात लपुन बसलेला आहे.अशी माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी स्थागुशा पोलीस पथकाने जावुन त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आला. पुढिल कायदेशीर कारवाई करीता त्यास बेंबळी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी योगेश शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर इसम हा सराईत गुन्हागार व पोलीसांवर हल्ला करण्याचा सवयीचा असुन त्याचेविरुध्द धाराशिव जिल्हात चोरी, घरफोडीचे व दरोडा अशा सदराखालील एकुण 16 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे आदेशाने व मार्गदशनावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस उपनिरीक्षक संदिप ओहेाळ, पोलीस अंमलदार विनोद जानराव, हुसेन सय्यद, फरहाण पठाण, अमेाल चव्हाण, नितीन जाधवर, बबन जाधवर, मेहबुब अरब व महिला पेालीस अंमलदार रंजना होळकर यांचे पथकाने केली आहे.