तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडगाव लाख येथे ग्रामनिधीमधुन पाणी पुरवठ्याच्या नावावर 50 हजार रूपयाची बोगस बीले काढले आहेत. याची सखोल चौकशी करुन संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करावा अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शिवराज राजेंद्र मेटे, ग्रामपंचायत सदस्य, वडगांव लाख ता. तुळजापूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, गटविकास अधिकारी तुळजापूर यांना निवेदन देवुन दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत वडगांव लाख ता.तुळजापूर या कार्यालयातील सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने पाणी पुरवठ्याचे कामाचे बोगस इस्टीमेट तयार करून व काम केल्याचे दाखवुन 50 हजार रूपयाचे बोगस बील उचलले आहे. परंतु तिथे काम अस्तीत्वातच नाही. तसेच इतरही 2-3 व्यक्तींच्या नावे बील काढल्याचे दिसुन येते. तरी सदरील कामाची लवकरात लवकर सखोल चौकशी करून संबंधीत दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा व सरपंचपद अपात्र करण्यात यावे अन्यथा मी ग्रामपंचायत कार्यालय, वडगांव लाख येथे आमरण उपोषणास बसणार आहे. याची गटविकास
अधिकारी यांनी दखल घ्यावी असे गटविकास अधिकारी पंचायत समिती, तुळजापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदरील निवेदन शिवराज राजेंद्र मेटे, ग्रामपंचायत सदस्य, वडगांव लाख ता. तुळजापूर यांनी दिले आहे.