धाराशिव (प्रतिनिधी)-मार्गशीर्ष मासानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी प्रमाणे यावर्षीही महिलांसाठी श्री महालक्ष्मी देवी, श्री ज्योतिबा देवस्थान आणि कणेरी मठ दर्शन सहल आयोजित करण्यात आली आहे. सदरील दर्शन सहल मंगळवार दि.19/12/2023 रोजी धाराशिव येथून पहाटे 4.30 वा. निघणार असून त्याच दिवशी रात्री 10.00 वाजेपर्यंत परत निघणार आहे.

मार्गशीर्ष मासानिमित्त यावेळी धाराशिव तालुक्यातील भाविक महिलांना महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी मंदिर तीर्थक्षेत्र कोल्हापूर येथे तसेच श्री जोतिबा देवस्थान आणि कणेरी मठ येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक बस या प्रमाणे 12 बसेसची सोय करण्यात आली आहे.

तरी तेर, येडशी, ढोकी, पळसप, कोंड, पाडोळी (आ), केशेगाव, बेंबळी, सांजा, वडगांव (सि), आंबेजवळगा, उपळा या 12 जिल्हा परिषद गटातील नोंदणी केलेल्या महिला भाविकांनी प्रतिष्ठान भवन, भाजपा कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.


 
Top