धाराशिव (प्रतिनिधी)-गळीत हंगाम 2023-24 मधिल 01 ते 15 डिसेंबर या कालावधीतील गाळपास आलेल्या ऊसाचे 2800/- प्रमाणे बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून एन. व्हि. पी. शुगर कारखान्याने पंधरवाडी बिल काढताना विलंब न करता पंधरवडा संपल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर बील जमा केले.
तरी शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.