परंडा (प्रतिनिधी) आज दि. 1 डिसेंबर 2023 रोजी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे शुक्रवार दि.1 रोजी व कै.महारुद्र (बप्पा) मोटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही /एड्स व विद्यार्थी या बदल डॉ.आनंद मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.आनंद मोरे यांनी विद्यार्थी हा देशाचा कणा आहे कोणत्याही मोहात न पडता लग्नापूर्वी संयम पाळावा तसेच व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन केले.
यावेळी आता नेतृत्व व आघाडी समुदायाची वाटचाल एड्स संपविण्याच्या दिशेने तसेच समाजाचा पुढाकार एचआयव्ही एड्स समुळ नाश या घोषवाक्याच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थाना शपथ देण्यात आली. यावेळी दतात्रय आडसुळ, आयसीटी सीचे रविन्द्र करपे व समुपदेशक मकरंद वांबुरकर, तानाजी गुंजाळ,सुधिर मस्के साहेबराव तुरेराव व महाविद्यालयातील प्रा.शरद झोंबाडे, प्रा. देशमाने, प्रा. एम. जी. मारकड, प्रा.अजित देशमुख ,प्रा.रणजित देशमुख, खैरे सर, मनियार सर श्रीमती उज्वला वणवे आदी उपस्थित होते.