परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील उप जिल्हा रुग्णालय मध्ये शुकवार दि.1 रोजी दिव्यांग रूग्णांची नियमीत तपासणी करण्यात आली.
या वेळी अस्थिव्यंग तज्ञ डॉ.प्रितमकुमार राऊत यांनी दहा रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधउपचार केले. या प्रसंगी लिपीक आमोल वांबूरकर,महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके.संस्थापक सचिव .रियाज पठाण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष .अमोल शेळके, जिल्हा अध्यक्ष.पांडुरंग मिसाळ.राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे, प्रमोद खोसे,विकास खैरे, सोमनाथ यादव, सुरेश मिसकीन, आदी लोक उपस्थित होते.